स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण; राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य

Veer Savarkar Defamation Case Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य (Savarkar Defamation Case) करण्यात आली आहे. पुणे येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केली, याप्रकरणी (Pune News) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेला बदनामीच्या खटल्याची सुनावणी चालू आहे.
लंडनमध्ये राहूल गांधी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्तव्य केले होते की, सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवलेले आहे की, आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा काही लोक एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करीत होते, ते बघून खूप आनंद वाटत होता. परंतू सावरकरांनी असे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाही, असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे. म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली. या बदनामीच्या खटल्याची सुनावणी आज न्यायालयात पार पडली.
मजा बन गई सजा! घिबली ट्रेंडमुळे गोपनीतेला धोका, सायबर हल्ला होणार…तज्ज्ञ काय सांगतात?
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. हा खटला काही ऐतिहासिक प्रसंगावर आणि घटनांवर अवलंबून आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात किती अन् कसे योगदान होते? विनायक दामोदर सावरकर यांनी किती पुस्तके लिहिली आहेत. विनायक दामोदर सावरकर यांचे मुस्लिमांविषयी काय विचार होते? विनायक दामोदर सावरकर यांचे ब्रिटिशांबरोबर संबंध कसे होते? अशा अनेक ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे. नैसर्गिक न्यायतत्वाला धरून व कायद्यातील तरतुदींनुसार बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी व उलट तपासणी विस्तृतपणे घेण्याचा अधिकार बचाव पक्षाला आहे.
Pravin Tarde Song : शिवरायांच्या लेकरांनो नीट ऐका! ‘बोल मराठी’तून प्रविण तरडेची नवीन इनिंग
परंतु या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत व सखोलपणे साक्षीदारांचा उलट तपास घेता येणार नाही. ‘समन्स ट्रायल’ म्हणून खटल्याची सुनावणी घेतल्यास बचाव पक्षाला या खटल्यात विस्तृत व सखोलपणे बाजू मांडण्याची, वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची, प्रसंगी सरकारकडून मागविण्याची परवानगी मिळू शकते. म्हणून या फौजदारी खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून या न्यायालयात व्हावी असा अर्ज अॅड.मिलिंद पवार यांनी केला होता.
वरील अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राहुल गांधी यांचा अर्ज व विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे या खटल्याची नियमित सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होईल. तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्र, राहूल गांधी यांनी लंडनमधील डायसापोरा या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्र, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रं ही सर्व कागदपत्र आजतागायत बचाव पक्षाला हस्तांतरित केलेली नाहीत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने फिर्यादी यांना द्यावेत, असा अर्ज अॅड मिलिंद पवार यांनी केला आहे. त्यावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. खटल्याची पुढील सुनावणी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.