Ajit Pawar & Sharad Pawar Not Coming Togater For PMC Election : पुणे महानगर पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन लढणार की नाही यावरुन अद्यापही संभ्रमावस्था कायम असताना आता पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादीची पुणे महापालिकेत आघाडी होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीतून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे काका-पुतण्याच्या मनोमिलन होणार याकडे आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
पुण्यात हाय व्होल्टेज ड्रामा! ना पोलीस संरक्षण, ना ताफा अजित पवार एकटेच कुठे रवाना? चर्चांना उधाण
अजितदादांची ऑफर ताईंनी नाकारली
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी शहरात जोर धरला होता. यासाठी बैठकींचं सत्रही सुरू झालं होतं. शुक्रवारी (दि.26) अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी अजित पवारांकडून एक मागणी करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, दोन्हीही राष्ट्रवादीचे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढतील. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा गट तुतारी चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पुण्यात युती होणार नसल्याचे अंकुश काकडे यांनी म्हटले आहे. एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या तुतारी या चिन्हावर ठाम आहे. यावरून दोन्हीही पक्षांमध्ये मतभेद झाला आणि अखेर दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटल्याचे काकडे यांनी जाहीर केले आहे. Ajit Pawar & Sharad Pawar Not Coming Togater For PMC Election
ब्रेकिंग : पवारांच्या एकनिष्ठ शिलेदाराची ‘पंजा’शी हातमिळवणी; जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
पिंपरीत एकत्रित येण्याच्या आशा कायम
एकीकडे पुण्यात जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचे अंकुश काकडे यांनी जाहीर केले असले तरी, दुसरीकडे मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या आशा अद्यापाही कायम आहे. कारण, पिंपरी चिंचवडमध्ये मात्र मविआ वगळता फक्त दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का? या अनुषंगाने अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या आज (दि.27) सकाळी सकाळी झालेल्या गुप्त बैठकीत चर्चा झाली, असल्याचे सांगितले जात आहे. घडाळ्याचा चिन्हावर लढा, असा प्रस्ताव पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांनी दिला नसल्याने चर्चा पुढच्या टप्प्यात येऊन पोहचली असल्याचेही सांगितले जात आहे.
