Download App

Ajit Pawar गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर; सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक वर्षांपासून सर्व पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंदबाग या निवासस्थानी एकत्र येत असते. यंदाही शरद पवार यांच्यासह सर्व कुटुंबिय बारामतीमध्ये उपस्थित आहे.

Namrata Sambherao: नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास! नवऱ्यासोबत झळकणार ‘या’ सिनेमात

मात्र यावर्षी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे अजित पवार या दिवाळीला गोविंदबागेत हजर राहणार का? अशा चर्चा सुरू होत्या. त्यात शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतापराव पवार यांच्या निवास्थानी भेट घेतल्याने अजित पवार दिवाळीला गोविंदबागेत असंही बोललं जात होतं मात्र दिवाळीनिमित्त भेट होऊनही अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत. ते गैरहजर का होते? याचं कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

…म्हणून अजित पवार गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर

अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिले आहेत. ते गैरहजर का होते? याचं कारण सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या जनतेला दिवाळी आणि पाडव्याच्या शुभेच्छा. सर्वांना हे वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचं जावो. महागाई, बेरोजगारी, दुष्काळाचं सावटातून सर्वांची मुक्तता होऊ दे.

Sanjay Raut : राम लल्ला आणि अयोध्या भाजपची मालकी नाही; भाजपच्या अश्वासनावर राऊतांचा हल्लाबोल

तर या दिवाळी कार्यक्रमाला दादा येऊ शकला नाही कारण त्याला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या 20-25 दिवसांपासून तो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेला नाही. त्यामुळे तो आजच्या गोविंदबागेतील दिवाळीला गैरहजर राहिला आहे. तसेच तो नसला तरी रणजित पवार आणि माझे इतर भाऊ आहेत. जे आहे ते मानाने स्विकारलं पाहिजे. असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या गैरहजेरीचं कारण सांगितलं आहे.

तसेच रोहित देखील येथे आलेला नाही. तो संघर्ष यात्रेमध्ये आहे. कोणी आजारी आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबातील प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडतो आहे. तसेच आपली तब्बेत सांभाळतो आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. असंही यावेळी सुळे म्हणाल्या आहेत.

follow us