पुणेकरांच्या आरोग्याचा खेळ थांबवा! खडकवासला धरणात सांडपाणी आढळताच अमोल बालवाडकर संतप्त

Amol Balwadkar: पुणेकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी महापौर आणि आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी.

Amol Balwadkar raised concerns over Khadakwasla Dam polluted water

Amol Balwadkar raised concerns over Khadakwasla Dam polluted water

Amol Balwadkar raised concerns over Khadakwasla Dam polluted water: पुणे : खडकवासला धरणात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी व्यक्त केली. या प्रश्नाकडे महापौर आणि महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी वॉटर प्युरिफायर भेट देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

पुण्यातील आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांना वॉटर प्युरिफायर भेट दिला. पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

दूषित पाण्याचा स्रोत शोधण्याची मागणी

खडकवासला धरणात दूषित सांडपाणी नेमके कुठून मिसळत आहे, याचा तातडीने शोध घेऊन तो स्रोत बंद करावा, अशी मागणी बालवडकर यांनी केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी मिळत असल्याची खात्री द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आश्वासनं नकोत, शुद्ध पाणी द्या!

पुणेकरांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, प्रशासनाने केवळ आश्वासनं देऊन थांबू नये, तर प्रत्यक्ष कृती करावी, अशी भूमिका अमोल बालवडकर यांनी मांडली. नागरिकांना शुद्ध पाणी मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालेगाव सुपारी प्रकरणात मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंचा दणका; FDA च्या 5 अधिकाऱ्यांवर निलंबन

दरम्यान, खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून यावर कोणती पावले उचलली जातात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version