Pune Election : पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार पुणे महानगरपालिका निवडणुकीत आंदेकर विरुद्ध कोमकर असा सामना रंगणार असल्याची शक्यता आहे. गुंड गणेश कोमकर याची पत्नी कल्याणी कोमकर हिने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखत दिली आहे. कल्याणी कोमकर हिने प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ आणि नारायण पेठ मधून निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मुलाखत दिली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणी कोमकर (Kalyani Komkar) हिने 19 डिसेंबर रोजी शिवसेना (Shivsena) भवन येथे जाऊन उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी कल्याणी कोमकरची मुलाखत घेतली. तर दुसरीकडे कालच कल्याणी हिने जर आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्यास आत्मदहण करणार असा इशारा दिल्याने पुण्याती राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी (Pune Municipal Corporation) 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यंदा पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्य लढत असून भाजप शिवसेना शिंदे गटसह युती करणार आहे.
Nashik – Pune Railway : नाशिक – पुणे रेल्वे कोणत्या मार्गाने जाणार? मंत्री विखेंनी स्पष्टच सांगितलं
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करणार असल्याने यावेळी पुण्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
