Anil Tingre appointed On Pune International Airport Advisory Committee : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सल्लागार समिती (Pune International Airport Advisory Committee) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाच जणांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये सुधीर मेहता, अभिजीत पवार, अखिलेश जोशी, अमित परांजपे आणि अनिल टिंगरे (Anil Tingre) यांचा समावेश आहे. यातील अनिल टिंगरे हे बॉबी टिंगरे या नावाने ओळखले जातात. ते 2017 मध्ये भाजपाच्या (BJP) तिकीटावर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
‘कुणाचाही बाप आला तरी…’, देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगेंचा इशारा नेमका कोणाला?
मोहोळ यांनी खासदार या नात्याने या सर्वांची नावे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कळवली होती. विमानतळावरील (Pune International Airport) सेवा आणि सुविधा या प्रवासी केंद्रीत असाव्यात या उद्देशाने विमानतळ सल्लागार समिती कार्यरत (Pune News) असते. केंद्रीय मंत्री मोहोळ यांना या समितीसाठी पाच नावे सुचवण्याचा ग्याचा अधिकार असून, या अधिकाराद्वारे मोहोळ यांनी ही नावे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालकांकडे सुपूर्द केली आहेत.
गिरीश बापट यांचे मार्च 2023 मध्ये निधन झालं होतं. त्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही. थेट मे 2024 मध्येच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. त्यानंतर त्यांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद सुपूर्द करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीला आठ महिने उलटून गेले, तरी देखील समिती स्थापन झालेली नव्हती.
मधल्या काळात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचं काम करण्यात आलं. तसेच, विमानतळाच्या धावपट्टीचं नव्याने विस्तारीकरण, जुन्या टर्मिनलचं दुरुस्तीकरण, धावपट्टी विस्तारीकरण आणि हवाई प्रवाशांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची कामं देखील हाती घेण्यात आलीत. हवाई तज्ज्ञांकडून आणि प्रवाशांकडून यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. शेवटी आठ महिन्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीतील सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.