‘कुणाचाही बाप आला तरी…’, देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगेंचा इशारा नेमका कोणाला?
Manoj Jarange Press Conference In Antarwali Sarathi : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद पाडली. यावेळी संतोष देशमुख हत्या (Santosh Deshumkh) प्रकरणावरून जरांगेंनी मोठा इशारा दिलाय. जरांगे म्हणाले की, उपोषणासंदर्भात आमच्या मागण्या सरकारला माहीत आहे. पावणे दोन वर्षांपासून आमचं हेच सुरू आहे, मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या. गॅझेट लागू करा, शिंदे समितीचं काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
आम्हाला संघर्ष करावा लागेल. समाज मला साथ देतो, समाज मला कधीही उघड्यावर पडू देत नाही. या आमरण उपोषणाला (Maratha Reservation) देखील मोठा प्रतिसाद मिळेल. आरक्षण सगळ्यांना हवं आहे. आम्ही नुसते आमदार मंत्री पक्ष यांना मोठे करणार नाही, मी समाजासाठी लढत आहे. स्वतःसाठी नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार. समाज मी कधीही सोडू शकत नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील. मराठ्यांशी ते बेईमानी करणार नाही. फडणवीस आम्हाला आरक्षण देणार. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही, ते आता उघड होणार. मराठ्यांशी बेईमानी करणं त्यांना महागात पडणार, नाहीतर मग त्यांना दाखवतो. आता त्यांची ढकलाढकली बंद होणार. खरे जातीयवादी कोण हे आता उघड होणार, फडणवीस सगळ्या मागण्या पूर्ण करणार असल्याचा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय.
समाजाची माझ्यावर माया आहे, म्हणून ते माझ्या उपोषणाला विरोध करत आहेत. पण मला समाजाची काळजी असल्यानं मी उपोषण करणार. कुणाचाही बाप आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. सूर्यवंशी हत्या प्रकरणाच्या मागण्या घेणार, उद्या देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असं जरांगे यांनी आवाहन केलंय. आता सगळं क्लिअर होणार, शिंदे समिती नोंदी का शोधत नाही? व्हॅलेंडिटी का देत नाही? हे आता कळेल. मराठ्यांच्या विरोधात सरकार काम करत की नाही, तेही आता उपोषणादरम्यान समोर येणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत.
Ananya Panday:अनन्या पांडेच्या हटके लूकमधील अदांवर चाहते घायाळ…
सरकार मराठ्यांशी आता बेईमानी करणार नाही. मराठ्यांनी भरभरून सरकारला मते दिली आहेत. मुख्यमंत्री आमच्याशी दगाफटका करणार नाहीत. उद्या 10 ते 11 वाजता उपोषण सुरू करणार. उद्या ज्यांना उपोषणात बसायचं ते बसतील, बाकी लोक येऊन पाठिंबा द्या. समाजाचा मला फक्त आशीर्वाद हवा आहे, आम्ही गावाबरोबरच आणखी दुसऱ्या ठिकाणी लोकांसाठी उपोषणाला बसायला जागा करणार आहोत, या उपोषणाआधी सरकारशी कोणतीही चर्चा आम्ही केलेली नाही.
कराडवर बोलताना जरांगे म्हणाले की, पोलीस-तपास यंत्रणेला काय पुरावा हवा आहे? ते कळत नाही, पण खंडणी मागायला कुणी पाठवलं? खून कुणी केला, हे लोकांना कळलं आहे. वाल्मीकवर खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही, बिडमधील कॉल व्हायरल झालेल्या पोलीस निरीक्षकाचे कॉल डिटेल्स काढा, वाल्मिकला सोडायचं ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये बसून सुरू झालं आहे का? असा सवाल जरांगेंनी केलाय. मुख्यमंत्री बिडमधील गुंडगिरीचा नायनाट करायचा असेल तर सखोल तपास करा, आरोपींना अटक करा. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकी देण्यात आली, तेव्हा हाच पोलीस निरीक्षक तिथे होता. वाल्मिकवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करा. ईडी कुठे, माझ्यामागे SIT लावता, वाल्मिककडे काय आहे हे कसं ईडीला कळत नाही. तपास यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडवू देऊ नका, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे बीड जिल्ह्यात जात बदनाम झाली. आधी जातीची पत काय होती? असा सवाल देखील त्यांनी केलाय.