Ankita Patil Complaint to Devendra Fadanvis : हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्या कन्या अंकिता पाटील ( Ankita Patil ) यांनी अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज पुन्हा इंदापूरमध्ये भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अंकीता पाटील यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यासमोर आपल्या मतदारसंघात त्यांना सामोरं जाव्या लागणाऱ्या समस्यांचा पाढाचं वाचून दाखवला. तसेच फडणवीसांना त्यावर तोडगा काढण्याची मागणी देखील त्यांनी केली.
‘मी थकणारा नाही चालणारा लोकप्रतिनिधी’; सदाशिव लोखंडेंचे विरोधकांना खडेबोल
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरात प्रचाराला लागले आहेत. त्यात भाजप आणि महायुतीने देखील जोरदार प्रचार सभा सुरू केल्या आहेत. त्यामध्ये आज ( 5 एप्रिल ) ला बारामती मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर इंदापूरमध्ये भव्य भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पवार, ठाकरेंसमोर नांग्या, पण होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर कॉंग्रेस नेत्यांवर चव्हाणांचा पलटवार
यावेळी बोलताना अंकीता पाटील म्हणाल्या की, या अगोदरच आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये भेटेलो तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या सर्व व्यथा सांगितल्या आहेत. आमच्या मनातील खदखद सांगितली आहे. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं सर्व काही ऐकून घेतलं. आम्हाला या ठिकाणी खूप त्रास होत आहे. तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. ग्रामपंचायत बरखास्त केल्या जात आहेत. मागच्या पाच ते आठ वर्षांमध्ये आतापर्यंत कधी न झालेला त्रास इंदापूर तालुक्यामध्ये आम्हाला होत आहे.
Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
अगोदर इंदापूरची ओळख सुसंस्कृत आणि विकसित तालुका अशी होती. मात्र आता हा तालुका ठेकेदारांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. काही दिवसांपूर्वी या समस्यांबाबत आम्ही एक विधान केलं होतं. ते या कार्यकर्त्यांच्या वतीने केलं होतं. ते 20 वर्षांपासून आमच्या मनात होतं. आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर तुम्हाला आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऐकण्यासाठी कार्यकर्ते आतुर आहेत. तुम्ही आश्वासन दिलं आहे. त्याप्रमाणे मागच्या चार वेळेप्रमाणे येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये आमच्या तालुक्यावर अन्याय न करता तसंच संबोधन तुम्ही आज कराल अशी अपेक्षा अंकिता पाटील यांनी तालुक्यातील समस्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडत व्यक्त केली.
या अगोदर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर महायुतीमधील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)गटातील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी ही अजित पवार गटातील नेते आपल्याला थेट जाहीर भाषणांमधून धमक्या देत असल्याचे म्हटले होते. महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी युतीधर्म पाळायला हवा असंही पाटील म्हणाले होते.