Download App

पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार! मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू, पाच ते सहाजण जखमी

पुण्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सुमारे चार लोक जखमी झाले आहेत.

  • Written By: Last Updated:

Pune Drink and Drive Case : पुण्यात पोर्शे कार अपघातानंतर पुन्हा एकदा शहरात (Drink and Drive) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राइव्हची थरारक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका पिकप चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये चार ते पाच वाहनांना उडवल्याची माहिती समोर आली आहे. यात एका महिलेचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यात अपघातात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या पत्नी असल्याची माहिती आहे.

Pune Crime : पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी कारवाई; शस्त्रं पुरवणारा सराइत गजाआड

चालकाला घेतलं ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील करिष्मा चौक ते पौड फाटा या रस्त्यावर रात्री ११ वाजता ही घटना घडली. एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने त्याच्याकडील असलेल्या पीकअप गाडीने ४ ते ५ वाहनांना धडक दिली. या घटनेत २ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष पवार असं चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अपघातातील वाहन- टेम्पो नंबर MH 12 UM 7821 याने एक चारचाकी, तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात 3 ते 4 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, पुण्यात ड्रंक आणि ड्राइव्ह करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई मोहिम सुरु करण्यात आली. त्यानंतर ही घटना घडली आहे.

CNG : गणेशोत्सवातच नागरिकांच्या खिशाला झळ; पुणे, पिंपरीमध्ये CNG महागला, काय आहेत नवे दर?

अपघातात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

गीतांजली अमराळे, असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून त्या मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी आहेत. श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे हे रस्त्यावर उभे असताना मद्यपी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. पिकपचे चाक गीतांजली अमराळे यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीकांत अमराळे देखील यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. आशिष पवार असे मद्यधुंद चालकाचे नाव असून स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून चांगला चोप दिला आहे.

follow us