Download App

Ashok Chavhan : मुंबईचे करता… मग पुणे महापालिकेचे ऑडिट भाजप का करत नाही?

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यात ज्या महापालिका आपल्या ताब्यात नाही. अशा महापालिकांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावायचा आणि तेथील महापालिका आपल्या ताब्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायचे, ही भाजपची कामाची पद्धत आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आदी यंत्रणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करायचा, हे सूत्र भाजपचे (BJP) आहे. आज मुंबई महापालिकेचे (Mumbai Muncipal Corporation) ऑडिट करून त्रास देऊन विकास कामे ठप्प करण्याचे काम भाजप करत आहेत. मात्र, भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिका (Pune Muncipal Corporation) आणि नागपूर महापालिकेतील (Nagpur Muncipal Corporation) चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. पुणे महापालिका आणि नागपूर महापालिकेचे ऑडिट (CAG Report) भाजप का करत नाही, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी उपस्थित केला.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात खूप चांगले सुरु केले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचे काम करत आहे. भाजपच्या ताब्यात नसलेल्या महापालिकांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेचे ऑडिट करण्याच्या नावाखाली तेथील विकास कामे बंद पाडली जात आहे. नागरिकांची अडवणूक केली जात आहे. गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत काय प्रकारची कामे होत आहेत, हे पुणेकरांना माहिती आहे. त्याबाबत अनेक स्वयंसेवी संस्थानी तक्रार केली आहे. मात्र, त्याची साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. मग भाजप पुणे महापालिकेचे ऑडिट का बरं करत नाही. हा प्रश्न या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने भाजपला विचारून धडा शिकवला पाहिजे.

Tags

follow us