Download App

Ashwini Jagtap : लक्ष्मणभाऊंनी अखरेच्या क्षणी मदत करुन वाचवला तरुणाचा हात

पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad )  पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap )  यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap )  यांना  उमेदवारी दिली आहे. यावेळी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लक्ष्मणभाऊंना भेळ व कांदा खायला खुप आवडायचे, कायम ते बाहेर गेले तरी भेळ व कांदा खायचे. तसेच त्यांना लहानपणापासून शेव व रेवडी देखील खाण्यासाठी आवडायचे. मला ही गोष्ट कार्यकर्त्यांनी सांगितली होती. मला बरेच दिवस माहित नव्हते की त्यांना शेव व रेवडी आवडते. ते अगदी हातगाडीवरुन शेव-रेवडी विकत घेऊन खायचे, अशी आठवण अश्विनी ताईंनी सांगितली. तसेच अनेक कार्यकर्त्यांचे नंबर त्यांना तोंडपाठ होते. त्यांच्या फोनवर कुणाचाही फोन आला की ते त्यांना नावाने हाक मारायचे, असे अश्विनी ताई म्हणाल्या.


तसेच सकाळी ते कायम मला उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा, असा आवाज देत उठवायचे. रोज सकाळी ते योग व व्यायाम करायचे. पण त्यांचे शेवटचे दिवस आठवले की अजूनही डोळ्यात पाणी येते, असे म्हणत त्या भावूक झाल्या होत्या.  शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना बोलता येत नव्हते. ते मला लिहून द्यायचे, अशी आठवण अश्विनी ताईंनी सांगितली.

त्यांनी जायच्या आदल्या दिवशी देखील एका तरुणाला मदत केली. लक्ष्मणभाऊ जाण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला एक फोन आला होता. एका तरुणाचा अपघात झाला होता. लक्ष्मणभाऊंनी आम्हाला विचारले काय झाले आहे. आम्ही त्यांना सांगितले की त्यांना मदतीची आवशक्यता आहे. त्यांनी सही केली व त्यांच्या आमदान निधीतून साडे सात लाख रुपयांची मदत केली. त्यांनी मदत केल्याचा दुसऱ्या दिवशीच त्यांचे निधन झाले. त्यांनी या जगातून निरोप घेताना देखील सामान्य नागरिकाची मदत केली, असे अश्विनी ताईंनी सांगितले.

 

Tags

follow us