Download App

MPSC Student : दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती? पुण्यात एमपीएससी विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला

Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना आता पुन्हा एक हादरवणारी घटना घडली आहे. पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र सुदैवाने ती वाचली आणि पुन्हा एक दर्शना पवार होण्याची दुर्घटना टळली आहे. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. ( Attack on MPSC Student in Pune as like Darshana Pawar )

भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. भर रस्त्यावरच हा भयावय प्रकार सुरू असताना या तरूणीच्या मदतीला सुरूवातीला कोणीही आलं नाही. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने धाडस करून हल्ला करणाऱ्या तरूणाल रोखल आणि सुदैवाने तिचे प्राण बचावले.

हिंमत असेल औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण काढा; इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा

यावेळी या तरूणीला बचावणाऱ्या तरूणाने या हल्लेखोराला चांगला चोपही दिला. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या हल्ल्यात ही तरूणी जखमी झाली असून तिच्यावर नजीकच्या रूग्णालयात उपाचार सुरू आहेत. त्यामुळे सुदैवाने दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली आहे.

आठवलेंकडून छगन भुजबळांना थेट पक्षात येण्याची ऑफर

Tags

follow us