Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाला आहे. घायवळ हा धाराशिव जिल्ह्यात एका गावच्या यात्रेत उपस्थित होता. त्यावेळी एका पैलवानाने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे. कुस्तीच्या फडात हा हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भूम तालुक्यातील आंदरुड गावाच्या यात्रेत ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, आंदरुड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त स्पर्धा आयोजितक करण्यात आली होती. निलेश घायवळनेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. घायवळ स्वतः कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. नेमक्या याचवेळी एक पैलवान अचानक घायवळच्या अंगावर धावून गेला. त्याने घायवळला मारहाण केल्याची माहिती आहे. त्याने घायवळच्या श्रीमुखात भडकावली.
Pune : ए घायवळ..ए मारणे.. तुला समजलं का? : नवीन आयुक्तांचा पुण्यातील गुंडांना जाहीर दम!
अचानक घडलेल्या या प्रकाराने आजूबाजूचे सगळेच गोंधळले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाणामारी सोडवली. घायवळच्या समर्थकांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. निलेश घायवळला मारहाण करुन हा पैलवान आता फरार झाला आहे. पोलीस या पैलवानाचा कसून शोध घेत आहेत. या पैलवानाने अचानक हल्ला का केला, यामागे नेमकं काय कारण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत निलेश घायवळ आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राउंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजत आहेत. स्पर्धेतील पैलवानांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निलेश घायवळ आला होता. याच वेळी एक पैलवान घायवळच्या अंगावर धावून गेला आणि त्याने त्याच्या कानाखाली मारली. हा पैलवान आणखी मारहाण करण्याच्या तयारीतच होता. पण घायवळच्या या पैलवानाला बाजूला केलं आणि चोप दिला. अचानक घडलेल्या या प्रकाराने मोठा गोंधळ उडाल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
गुंडांची मस्ती पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी