गुंडांची मस्ती पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी

  • Written By: Published:
गुंडांची मस्ती पोलिसी खाक्या दाखवून कंट्रोलमध्ये आणावी लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी (Pune Crime) वाढली आहे. या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी नवीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गुन्हेगारी टोळ्यांची परेड घेतली. त्यानंतरही गुन्हेगारीचं उदात्तीकरणं करणारे रिल्स सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहे. यावर बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री जित पवारांनी (Ajit Pawar) गुन्हेगारांना इशारा दिला. सर्वांना दम देऊनही सोशल मीडियावर रिल्स पोस्ट करणं सुरूच असेल तर पोलीसी खाक्या दाखवावाच लागेल, असं ते म्हणाले.

Nitesh Rane : ‘ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य गँगवॉर, दोघांची ‘नार्को’ करा’; नितेश राणेंचा पलटवार 

पुण्याचे नवीन आयुक्तांना तब्बल पाचशे गुन्हेगारांना एकत्र बोलावून त्यांची परेड काढली. त्यांना सज्जड दम दिला. कोणताही गुन्हा करू नका, कोणत्याही गुन्ह्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समर्थन करू नका, गुन्ह्यात सहभागी होऊ नका, गुन्ह्याचा गौरव करणारे व्हिडिओ बनवू नका, रील बनवू नका, स्टेटस ठेवू नका अशा सुचना दिल्या. मात्र, तरीही या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करणं सुरूच आहे. पोलिसांनी गुंडांची ओळख परेड घेऊनही निलेश घायवळ यांचं एक रील व्हायल झालं. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, एवढं सगळं करूनही असे प्रकार सुरू असतील तर या सर्व गुन्हेगारांना पोलीसी खाक्या दाखवायला हवा. पोलिसी खाक्या दाखवूनच ही मस्ती कंट्रोलमध्ये आणावी लागेल. यासंदर्भात मी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकक्षकाची भेट घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयी चर्चा करणार आहे, असं ते म्हणाले.

“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल 

कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करून गुंडांची बीती लोकांच्या मनातून काढून टाकली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांना आज पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या कामाची पाहणी केल्यानंतर माध्ममांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

विरोधक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करताहेत
दरम्यान, दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, काल घडलेली घटना चुकीची आहे, महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. व्हिडीओ पाहिला तर अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरव्होन गप्पा मारतांना दिसतात. दोघांचं संभाषण ऐकल्यावर ओळख चांगली आहे, असं दितसंय. मात्र, या प्रकरणाची नीट चौकशी व्हायला हवी. ही घटा माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणावरून विरोधक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube