“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल

“ज्यांनी माझी पाटी काढली त्यांना मीच महापौर केलं”; अजितदादांचा प्रशांत जगतापांवर हल्लाबोल

Ajit Pawar : ‘ज्यांनी माझ्या नावाची पाटी काढली त्याला अजित पवारनेच (Ajit Pawar) महापौर केलं. त्याला पक्षातलं कुणीच पाठिंबा देत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्यासाठी देखील मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आजही त्यांचा राजीनामा आहे. मी जे बोलतो ते खरं बोलतो. खोटं बोलून लोकांची दिशाभूल मला करायची नाही. तो राजीनामा मी ठेऊन घेतला. जयंतरावांनाही मी म्हटलं की तुम्ही त्याला समजावून सांगा मीही सांगतो. मी वेळोवेळी त्याला योग्य सल्लाही दिला. मधल्या काळात त्यांच्याबाबतीत वेगळ्या बातम्याही आल्या त्यातूनही मी त्यांना सावरून घेण्याचा प्रयत्न केला. एखादा कार्यकर्ता आपल्याबरोबर काम करत असतो त्याची बदनामी करणं त्याला नाउमेद करणं हा माझा प्रयत्न कधीच नसतो’, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर हल्लाबोल केला.

अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुण्यातील काही लोक खूप आक्रमक पद्धतीने काम करत आहेत. मध्यंतरी तुमच्या नावाची पाटी देखील काढण्यात आली, असे विचारले. यावर अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांचा नामोल्लेख टाळत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यांनी माझ्या नावाची पाटी काढली त्याला अजित पवारनेच महापौर केलं. त्याला पक्षातलं कुणीच पाठिंबा देत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्यासाठी देखील मीच पुढाकार घेतला, असे अजित पवार म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं ?

निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूने दिल्यानंतर पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अजित पवार यांच्या नावाची कोनशिला फोडली होती. या घटनेवरच आज अजित पवार यांनी जगताप यांना प्रत्युत्तर दिली.

Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’ CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच

राज्यसभेसाठी कोण अजितदादांनी सांगितलं 

भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांची नावे पाठवायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पक्ष त्यांचा अंतर्गत निर्णय घेत असतो. आमच्याबाबतीत दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. आमच्याकडे सुद्धा सात ते आठ लोकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. आता एकत्रित चर्चा करून काय तो निर्णय घेऊ असे अजित पवार म्हणाले.

बारामतीचा निर्णय चर्चा करून घेऊ

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांनीच निर्णय घ्यावा असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत. याआधी बावनकुळे म्हणायचे की बारामतीची जागा भाजपाच लढवणार असे विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, याबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, तु्म्हालाही सांगू. शिंदे साहेबांच्या पक्षाला किती जागा गेल्यात, आम्ही किती जागा लढवतोय. भाजपला किती जागा मिळणार, आणखी कोण मित्रपक्ष आहे ते किती जागा लढवणार हे तुम्हाला नक्की सांगू.

Ajit Pawar : “दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय”.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

आम्ही त्यांची दिशाभूल केली नाही 

दिशाभूल करून प्रतिज्ञापत्रावर अजित पवार गटाने सह्या घेतल्या असा आरोप पाच आमदारांकडून होत आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले. असं आजिबात नाही. जे असे म्हणतात ना ते स्वतःच तिथे शपथविधीला हजर होते. त्यांनी प्रसारमाध्यमांना माहितीही दिली. आता त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. ते आमदार खासदार आहेत त्यांना कोण बळजबरी करणार? त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज