Download App

सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्यावरुन आव्हाड-पटेल यांच्यात जोरदार भांडण, भुजबळांचा गौप्यस्फोट

Chagan Bhujbal on Sharad Pawar : चव्हाण सेंटरमध्ये पवार साहेब यांनी राजीनामा दिला. तेव्हा मी समोर सांगितले होते की सुप्रिया सुळे यांना कार्यध्यक्ष करु म्हणून. माझं ऐकलं नाही. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षा करा हा ठराव केला होता. पण त्यावेळी जितेंद्र आव्हाड आणि प्रफुल पटेल यांच्यात जोरदार भांडण झाल्याचा गौप्यस्फोटही भुजबळांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर छगन भुजबळ पाहिल्यांदाच पुण्यातील फुले वाड्यात आले होते.

2014 पासून भाजपचं सरकार आहे तेव्हापासून मी मी साहेबांच्या विरोधात भांडलो. 2017 ला मी जेलमध्ये होतो. 2014 ला शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्यात एक डील झालं. यानुसार तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो असं ठरलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं

भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करु असं सांगण्यात आले. पवार साहेबांनी पाठिंबा दिला. पण अचानक शिवसेना बरोबर महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली. यामुळे अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी केला, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. लढायच तर लढले पाहिजे पण सतत तळ्यात मळ्यात निर्णय होतात, ते योग्य नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

अपात्र आमदारांचा निर्णय कुठं अडलायं? विधानसभा अध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलं…

माझे विचार महात्म फुले समता पारिषदेचे मी ते कदापि सोडणार नाही, आम्ही भाजप सोबत गेलो आहोत, भाजपमध्ये नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. मी वन मॅन आर्मी सारखा लढलो, माझ्या घरावर हल्ला देखील झाला होता. मी डगमगणार नाही. मी ओबीसीसाठी काम करत आहे. जे काम करेल त्यांच्याकडून काम करुन घेणार, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं.

मी ‘नागपुरचा कलंक’ तर तुम्ही ‘कलंकीचा काविळ’, देवेंद्र फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर…

शरद पवार यांनी नेहमी डळमळीत निर्णय घेतले, निर्णय बदलले, भाजप सोबत जाण्याचा शब्द देऊन तो फिरवला. या सगळ्याचा परिणाम म्हणून आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत गेलो, अशी टीका छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केली.

Tags

follow us