Ayush Komkar Murder Case Laxmi Andekar Bail: पुण्यातील बहुचर्चित आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन आदेशाला स्थगिती देण्याची विशेष सरकारी वकिलांची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
लक्ष्मी आंदेकर यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर त्यांच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला. सुनावणीनंतर न्यायालयाने लक्ष्मी आंदेकर यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांनी जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला चार आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. मात्र, ॲड. विपुल दुशिंग यांनी या मागणीला विरोध करत लक्ष्मी आंदेकर यांचा कथित गुन्ह्यातील सहभाग नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला.
Mumbai : दिवाळीच्या तोंडावर लक्झरी बसमधून माव्याची बेकायदेशीर वाहतूक!
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाची स्थगितीची मागणी फेटाळली आणि जामिनाचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे आयुष कोमकर हत्या प्रकरणात लक्ष्मी आंदेकर यांना दिलासा मिळाला आहे.
