Bageshwar Baba : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली.
वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न…
वारकरी परंपरेचे कळस मानले जाणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबाबत बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर आता तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असताना बागेश्वर बाबा यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली.
‘2 मिनिटाच्या सीनसाठी किंग खानने घालवलेत तब्बल 6 तास; ‘डंकी’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिंगेला
यावेळी बागेश्वर बाबा यांनी माध्यामांशी संवाद साधला असता ते म्हणाले, आज मी संत तुकाराम महारांजांचं दर्शन करण्यासाठी देहूमध्ये आलो. यावेळी मला आदर आणि सन्मानपुर्वक दर्शन मिळालं. यावेळी इंद्रायणी नदीचे देखील दर्शन घेतलं. ज्यामध्ये संत तुकारामांनी त्यांचे वाहून गेलेले ग्रंथ ओले न होता परत मिळवले होते. तसेच या संत परंपरेच्या कृपेने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं अशी प्रार्थना मी केली आहे.
ICC : ‘ट्रान्सजेंडर’ खेळाडूंसाठी बॅड न्यूज! आंततराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे बंद
तसेच यावेळी आपल्या संत तुकाराम महाजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, मी त्याबद्दल माफी मागितलेली आहे. तसेच मला सर्व संताबद्दल आदर आहे. ते वक्तव्य माझ्या भाषेमुळे वादग्रस्त वाटलं. मझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. आज पुन्हा त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली आहे. वारकऱ्यांना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असं ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका प्रवचनात बोलताना बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री यांनी एका निरूपणावर उदाहरण देताना वारकरी परंपरेचे कळस मानले जाणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर त्यानी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माफी देखील मागितली होती.