Download App

Pune Accident मधील आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा; असीम सरोदेंनी सांगितलं कारण

Pune Accident प्रकरणी सहा जणांना न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bail for the accused in Pune Accident says Aseem Sarode : कल्याणीनगर अपघात ( Pune Accident ) प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे ( accused ) वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने पोलिसांनी अग्रवालला न्यायालयात हजर केले. त्यावेळी विशाल अग्रवालसह सहा जणांना (Vishal Agrawal) न्यायालायाने 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपींचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती या प्रकरणातील वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.

व्हीके सक्सेना मानहानी खटल्यात Medha Patkar दोषी; 24 वर्षांपुर्वीच्या प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निकाल

यावर बोलताना सरोदे म्हणाले की, कल्याणीनगर अपघात ( Pune Accident ) प्रकरणी पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्या आरोपींना 6 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या आरोपींचा जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला आज पाच वाजून गेल्यामुळे या आरोपींकडून आज जामण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही मात्र उद्या सकाळी या संदर्भात अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

Porsche Car Accident : अखेर पोलीस आयुक्तांना जाग, येरवड्याचे दोन अधिकारी निलंबित

तसेच या प्रकरणामध्ये दारूबंदीचं आणि 420 कलम देखील लावण्यात आला आहे. 420 लावण्याचे कारण म्हणजे या गाडीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेले नव्हतं. त्यामुळे जी काही वाढीव कलम या प्रकरणांमध्ये लागली आहेत ते आरोपींसाठी पुढे कठीण जाणार असल्याचे देखील सरोदे यांनी सांगितलं.

कोर्टात नेमकं काय घडलं?

मागील वेळी विशाल अग्रवालला न्यायालयात नेत असताना काही जणांना त्याच्यावर शाईफेक केली होती. त्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज (दि.24) अग्रवालला न्यायालयाच्या मागील गेटने नेण्यात आले. त्यानंतर सुनावणी पोलिसांनी अल्पवयीन तरुणाचा मोबाईल आत्ताच मिळाला आहे. तसेच विशाल अग्रवाल याची देखील पुन्हा चौकशी करायची करायची आहे. काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.

याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला याचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे चौकशीसाठी आणखी सात दिवासांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले. मात्र, ही मागणी फेटाळत कोर्टाने विशाल अग्रवालची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालायाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवालचा जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

follow us

वेब स्टोरीज