पिंपरी : पैशाच्या व्यवहारातून एकाचे अपहरण केल्याची तक्रार आल्यामुळे चिंचवड पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा कुख्यात गुंड बाळा वाघेरे याला अटक केली. पिंपरी गावातील राहत्या घरी पोलिसांनी धाड टाकून बाळा वाघेरेसह हरीश चौधरी, राहुल उणेचा यांच्यासह आणखी एका अनोळखी इसमाच्या विरोधात चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाळा वाघेरे याने मागील काही वर्षात शहरातील गुन्हेगारीवर एकहाती सत्ता गाजवत आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे.
Uddhav Thackeray यांचं ठरलं : पदरात काही नाही पडले तरी भाजपशी युती नाही!
फिर्यादी आणि आरोपी हरीश चौधरी यांच्यात काही महिन्यांपूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाली होती. ते पैसे फिर्यादीने आरोपीला परत केले होते. परंतु, तरीही पैशांची मागणी फिर्यादीकडे आरोपी चौधरी करत होता. बुधवारी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे अपहरण केले. तसेच फिर्यादीला कुख्यात गुंड बाळा वाघेरे याच्या घरी घेऊन गेले. तिथे आरोपींनी फिर्यादीकडे सात लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मात्र, त्यानंतर फिर्यादीने पैसे देतो, असे सांगून स्वतःची सुटका करून घेतली. तसेच थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील तक्रारीवरून बाळा वाघेरे याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. मागील काही वर्षापासून भूमिगत (अंडरग्राउंड) असलेल्या बाळा वाघेरेला पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हरीश चौधरी यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी आर्थिक व्यवहार देवाणघेवाण झाली होती. तसेच फिर्यादीने या व्यवहारातील सर्व रक्कम हरीश चौधरीला परत केली होती. परंतु, तरी देखील आरोपी फिर्यादीकडे पुन्हा पैशांची मागणी करत होते.