Download App

Balbharti to Paud Phata Road : नुसताच पाहणी दौरा… बोगद्यातून रस्ता कधी करणार ?

पुणे : माझी टीम तसेच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ असे पणे महानगरपालिकेचे रस्ते विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत उद्या मंगळवार (दि. २८) रोजी संध्याकाळी प्रस्तावित बालभारती पौडफाटा लिंक रोड प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी, अधिक चांगली माहिती मिळवण्यासाठी संपूर्ण रस्ता चालून सर्वेक्षण करणार आहोत, असे भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी या पाहणी दौऱ्यात नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, बालभारती ते पौड फाटा या लिंक रोड बद्दल अधिक माहिती मिळविण्यास इच्छुक असलेले सर्व नागरिक किंवा ज्यांना प्रकल्पाबद्दल प्रश्न, समस्या आणि इतर उपाय आहेत. त्यांना या रस्ता पाहणी दौऱ्यात मी आमंत्रित करतो.

Amruta Fadnavis Bribe Case : अनिक्षाला जमीन… तर अनिल जयसिंघानीला न्यायालयीन कोठडी – Letsupp

आम्ही मंगळवारी (दि.२८) रोजी सायंकाळी ५.३० वाजता सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती येथून रस्ता पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहोत, असे शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले आहे.

बालभारती ते पौड फाटा हा डोंगरातील बोगद्यातून रस्ता करण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या रस्त्याला पर्यावरण चळवळीत काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि पुणेकर नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रलंबित आहे. या रस्त्यावर दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळात प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांनी बालभारती ते पौड फाटा असा बोगद्यातून रस्ता करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध आहे.

(230) Eknath Shinde | राहुल गांधी यांची लायकी आहे? | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us