अजितदादांनंतरचा बारामतीचा आमदार कोण? पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी…

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली असून दिवंगत अजित पवार यांच्यानंतरचा आमदारही ठरला आहे.

Ajit Pawar & Sunetra Pawar

Ajit Pawar & Sunetra Pawar

Baramati By Election : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालीयं. त्यामुळे आता पुढील काही दिवसांतच बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. अशातच राजकीय वर्तुळातून बारामती विधानसभा मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार? याबाबतची माहिती समोर आलीयं. दिवंगत अजित पवार यांच्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलीयं. त्यामुळे सुनेत्रा पवारच बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलंय.

107 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे 20 हून अधिक खोटे दावे; भारताबद्दलही केला फ्रॉड दावा

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडलीयं. या बैठकीत पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाच उभे करण्यावर पक्षातील नेत्यांचं एकमत झालं आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आता सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभआगृहातच सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवारच पोटनिवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय.

अवकाळीचं संकट कायम,’या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अलर्ट जारी

याबाबत बोलताना शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदारयादी 10 मार्चला प्रसिद्ध होणार आहे. पोटनिवडणूक कधीही लागू शकते, बारामतीची ही पोटनिवडणूक अर्थात बिनविरोध होईल. अजितदादा गेल्यानंतर ही निवडणूक होत आहे. हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. निवडणूक बिनविरोधच होईल, यात मला तिळमात्र शंका नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार याच पोटनिवडणूक लढणार असून दुसरीकडे अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

Exit mobile version