‘माझ्या उमेदवारीची मागणी जनतेतून, बारामती हेच कुटुंब’; विरोधकांच्या टीकेवर सुनेत्रावहिनींची टोलेबाजी

Baramati Loksabha : माझ्या उमेदवारीची मागणी बारामतीच्या (Baramati Loksabha) जनतेतून, बारामती हेच माझं कुटुंब असल्याची टोलेबाजी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी केली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी माजी खासदार प्रदीप रावत (Pradip Rawat) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना रावत यांनी खडकवाल्यातून सुनेत्रा पवारांना एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य […]

Sunetra Pawar यांच्यासाठी पुण्यानंतर काटेवाडीकरही एकवटले; थेट मंत्रिपदाची केली मागणी

Sunetra Pawar

Baramati Loksabha : माझ्या उमेदवारीची मागणी बारामतीच्या (Baramati Loksabha) जनतेतून, बारामती हेच माझं कुटुंब असल्याची टोलेबाजी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी केली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी माजी खासदार प्रदीप रावत (Pradip Rawat) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना रावत यांनी खडकवाल्यातून सुनेत्रा पवारांना एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य देणार असल्याचं आश्वासनच दिलं आहे.

कल्याणनंतर ठाणेही शिंदेंकडेच; भाजपनं दावा सोडला?; दणदणीत विजयाची शिंदेंची ग्वाही

सुनेत्रा पवार म्हणाल्या, अजितदादांनी वेगळी भूमिका विकासाच्या मुद्द्यावरच घेतली असून बारामतीच्या विकासाचा पॅटर्न वेगळा आहे, तसाच पॅटर्न राबवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी जसं बोलते अगदी तसंच बोलून मी संसदेत प्रश्न मांडू शकते, मतदारांची भाषा मी जाणते त्यामुळे संसदेत त्यांचे प्रश्न मांडणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी यावेळी सांगितलं आहे. विरोधकांकडून सुनेत्रा पवार यांच्या वकृत्वावरुन टीका केली जात आहे. याच टीकेला पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

तसेच अजितदादांनी मतदारसंघात महाराष्ट्रात जे काम केलं आहे त्यांचं काम लोकांना माहिती आहे. लोकांचा विश्वास आहे की जे ते बोलतात ते काम करुन दाखवतात. लोकांचा विश्वास आहे त्यामुळे मतदार मतदान करतीलच. माझी ही आयुष्यातील पहिलीच निवडणूक असून निवडणुकीत आरोप होतच असतात. मात्र, निवडणुकीनंतर सुधारणा होईल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

Sikkim Elections : ना घर, ना जमीन.. प्रचारासाठी स्कूटर अन् माईक; ‘गरीब’ उमेदवार देतोय मंत्र्याला टक्कर

बारामती मतदारसंघात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यावर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, उमेदवारी अर्जाबाबत मला काहीही माहिती नाही माध्यमांकडून समजत असल्याचं सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलं आहे.

फुले-शाहु-आंबेडकरांचाच विचार पुढे नेणार…
आम्ही महायुतीमध्ये असलो तरीही फुले-शाहु -आंबेडकरांचाच विचार पुढे घेऊन जाणार आहोत. अजित पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावरच महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही महायुतीत असतानाच या विचारासोबतच विकासाचा मुद्दाही पुढे नेणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी सांगितलं आहे.

Exit mobile version