Bhau Saheb Rangari Ganpati पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. 14) दुपारी 12 वाजून 30 मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची जंगी आगमन मिरवणूक देखील निघणार आहे.
मोदी, पुतिन, जिनपिंग अन् पेजेशकियन एकाच मंचावर; ब्रिक्समधून भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी’चे दर्शन
मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर उत्सव मंडपातून सव्वा आठ वाजता श्रींची आगमन मिरवणूक सुरू होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना, केशव शंखनाद ही ढोल पथके या प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीत वादन करणार आहेत. याशिवाय आढावा बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळ ही मिरवणुकीत पाहायला मिळणार आहेत.
जरांगेंच्या मुंबई मोर्चाच्या घोषणेनंतर बारस्कर आक्रमक; ‘हे आंदोलन इमेज ब्रँडिंगसाठी’
सकाळी सव्वा आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. भवनापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने पुढे बुधवार चौकात आणि तेथून तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता मार्ग या मिरवणुकीचे आगमन गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. त्यानंतर साडे बारा वाजता जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
‘आता ही शेवटची लढाई, मेलो तरी मागं हटणार नाही’; जरांगेंचा सरकारला इशारा!
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहावे, अशी विनंती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केली आहे.
