Download App

‘भीमाशंकर’ला पुजाऱ्यांमध्ये जोरदार राडा ! गुन्हे दाखल, नेमका वाद काय ?

  • Written By: Last Updated:

पुणेः भीमाशंकर (BhimaShankar) मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. थेट लोखंडी रॉडने जोरदार मारहाण झाली आहे. यात काही जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी 36 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. भीमाशंकर गाभारा व त्याचजवळ असलेल्या शनि मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे जोरदार गोंधळ उडाला.

‘खेलो इंडिया’तून ‘608 कोटी’ निधी अन् एशियन गेम्समध्ये मेडल ‘0’ : गुजरात मॉडेलवर काँग्रेसची टीका

हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी घडला आहे. सोमवार असल्याने भाविकांच्या दर्शनाासाठी रांगा लागलेल्या होत्या. पुजाऱ्यामधील भांडणेही काही जणांनी आपल्या मोबाइलमध्ये टिपली आहेत. हे व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाली आहेत.

याप्रकरणी दोन्ही गटाने एकमेंकाविरोधात तक्रार दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी रात्री दोन्ही बाजूच्या 36 पुजाऱ्यांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. शंकर गंगाराम कौदरे यांच्या फिर्यादीवरून 21 जणांविरुद्ध, तर गोरक्ष यशवंत कौदरे यांच्या तक्रारीवरून 15 जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


Imran Hashmi ‘टायगर ३’ मधील सीन्स कापल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाला…

कशावरून एकमेंकाना भिडले !
भीमाशंकर मंदिर, शनि मंदिरात पूजा करणाऱ्यावरून पुजाऱ्यांमध्ये जुना वाद आहे. हा वाद सोमवारी पुन्हा उफाळून आला आहे. सोमवारी दुपारी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्याचवेळी पुजाऱ्यांमध्ये वादावादी सुरू झाली. एका गटातील जमावाने पुजेला बसलेल्या पुजाऱ्यांना जबरदस्तीने उठवित जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. त्यात काही जणांच्या हातामध्ये काठ्या, लोखंडी पाइप होते. त्यातून एकमेंकावर दोन्ही गट तुटून पडले होते. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.


जाणीवपूर्वक खोडसाळपणा

या वादावर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांनी प्रतिक्रिया दिली. पुजा सुरू असताना अडथळा निर्माण करण्यात आला आहे. तसेच काही जण जाणीवपूर्ण खोडसाळपणा करून वाद वाढवत आहेत. यावर चर्चा करून सामोपचराने तोडगा काढण्यात येईल, असे कौदरे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us