Bhushi Dam Incident : सध्या पावसाचे दिवस असल्याने पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी जात आहेत. अशातच पुण्यातील लोणावळ्यातील भुशी डॅम धरणात पाण्याचा अंदाज चुकल्याने दोन तरुण जीवाला मुकले आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालायं.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात; पुण्यातील बैठकीत एकमताने निर्णय
लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात धरणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद जमाल, साहिल शेख असं या तरुणांचं नाव असून ते वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी आले होते. भुशी डॅम धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाल्याची माहिती आहे. सध्या या दोन्ही तरुणांचे लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून मृतदेह पाण्यातू बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
आधी झालं जोरदार स्वागत नंतर बेदम मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू; लग्न सोहळ्यातील धक्कादायक घटना
अख्ख कुटुंब डोळ्यादेखत वाहून गेलं…
काही महिन्यांपूर्वीच लोणावळ्यातील भुशी धरणाच्या बॅक वॉटरजवळ एक भयानक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील 10 जण या ठिकाणी अडकले होते. या 10 जणांपैकी 5 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती.
दरम्यान, लोणावळ्यासह इतर पर्यटन स्थळांवर सावधानता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहनाकडे पर्यटक कानाडोळा करीत आहेत. मागील वर्षी याच ठिकाणी बॅक वॉटरचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला होता. त्यात एकाच कुटुंबातील 10 जण अडकले होते.