Download App

मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात…

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांत ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे.

विविध कार्यक्रमानिमित्त अमित शहा हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. धुमाळ याने आपण मुख्यमंत्री आणि खासदार शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगत एका अधिकाऱ्याकडे गेला. त्यांनी स्थानिक पोलिसांना चकवाही दिला. मात्र, शहांसोबत असलेल्या पोलिस यंत्रणेच्या नजरेतून तो सुटला नाही.

Pune By Election: मी मरणार, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा अजित पवारांकडून समाचार 

दरम्यान, त्याचा शोध घेत पोलिसांनी त्याला गाठले. तो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे माहिती असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. ही व्यक्ती कोण आहे ? ती कोणाच्या वाहनात बसली, याबाबतची चौकशी स्थानिक पोलीस करीत आहेत.

Tags

follow us