Download App

मोठी बातमी! ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना मारहाण

  • Written By: Last Updated:

पिंपरी चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही पक्षांकडून सभांचा, रॅलींचा धडका सुरू आहे. त्यात संध्याकाळच्या सुमारास महाविकास आघाडीचा प्रचार सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  शहराध्यक्ष सचिन भोसले (Sachin Bhosale) यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर काल ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून माझी खा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. ह्या घटना ताज्या असतांनाच आता ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनीही आपल्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा केला. त्यांनी स्वत: लेट्सअप मराठीला याबाबतची माहिती दिली.

सचिन भोसले यांनी सांगितले की, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महविकास आघाडीचे उमेवार नाना काटे यांचा प्रचार करत असतांना भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. काटे यांचा प्रचार करत असताना अचानक भाजप कार्यकर्त्यांनी आपला रस्ता अडवला आणि आपल्याला मारहाण केल्याचं त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड येथील गणेश नगरमध्ये मला आज सायंकाळी मारहाण करण्यात आल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या मारहाणीत मी जखमी झालो असून सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचं त्यांनी सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=BAuO0YIHxfU

ते म्हणाले की, मला झालेल्या मारहाणीत मारेकऱ्यांनी माझ्या हातावर आणि छातीवर ब्लेडने सपासप वार केले. त्यामुळं उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, चिंचवडच्या निवडणुकीचा प्रचार काही दिवसात संपणार असल्याने दिग्गजांची प्रतिस्थांपणाला लागली आहे. त्यामुळे आज भोसले यांना झालेल्या मारहाणीने निवडणुकीला गालबोट लागले असून ही पोटनिवडणूक आता मुद्द्यावरून गुद्द्यवर आल्याचे पहायला मिळत आहे.

Tags

follow us