Download App

बापटांच्या निधनानंतर जगदीश मुळीक यांचा मोठा निर्णय; म्हणाले, मला आजवर…

  • Written By: Last Updated:

BJP Jagdish Mulik Post On Social Media : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पुणे शहर आणि भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बापट यांच्या निधनानंतर भाजपसह अनेक नेत्यांचे श्रद्धांजली देणारे फ्लेक्स शहरभर लावण्यात आलेले दिसून येत आहे. त्यानंतर आता भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी फेसबुकवर पोस्ट करत कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना आवाहन केले आहे.

Veer Savarkar यांची पोस्ट शेअर करत पोंक्षे म्हणाले, ‘याला म्हणतात…

मुळीकांची फेसबुक पोस्ट काय?

वाढदिवसासंदर्भात
नम्र निवेदन !

माझ्या वाढदिवसदिनी अर्थात १ एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरुन शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता. आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद !
यंदा लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे माझा १ एप्रिल, २०२३ रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी याची नोंद घ्यावी ! वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आल्याचे जगदीश मुळीक यांनी स्पष्ट केले आहे.

नेता गेला मात्र, कार्यकर्ते विसरले दुःख?

एकीकडे बापट यांच्या निधनामुळे भाजपचे शहराध्यक्ष मुळीक यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे बापट यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी राम नवमी पुणे आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणच्या उत्सवात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाल्याच्या चर्चा आहेत. कार्यकर्त्यांच्या या भुमिकेमुळे अनेकांनी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याचे एकदिवस आधी निधन होते. त्यानंतर शहरभर श्रद्धांजली वाहणारे आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय एकत्र येतो. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी साजऱ्या झालेल्या राम नवमी उत्सवात एकदिवस आधी आपला नेता गेल्याच्या दुःखात असणारे भाजपचे कार्यकर्ते अशा पद्धतीने उत्सवात आनंदाने कसे काय सहभागी होऊ शकतात? असा सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us