Download App

भाजपाचं ठरलं! पुण्यात अजितदादांना शह? शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही..

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की

Pune News : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर (Pune News) लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाच्या हिशोबानेच काही डावपेच टाकण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त बस्तान बसवण्यासाठी भाजपने वेगळी स्ट्रॅटेजी आखली आहे. याचा प्रत्यय पुण्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून येत आहे. निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याबाबत अजून स्पष्टता नाही. पण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे इतकं मात्र नक्की.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यात अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वाधिक पाच आमदार आहेत. शिंदे गटाचे दोन, ठाकरे गट आणि भाजपचा प्रत्येकी एक आमदार आहे. आता जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असतानाही भाजपने धक्का देण्याची तयारी चालवली आहे हे विशेष.

दाक्षिणात्यांनीच डान्सबार आणि लेडिजबारने महाराष्ट्र नासवला; राड्यानंतर संजय गायकवाडांचं पुन्हा अजब विधान

भाजपमधून जे सोडून गेले आहेत त्यांच्या अडचणीत वाढ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी एक टीमच काम करत आहे. याची जबाबदारी भाजप आमदार राहुल कुल यांना देण्यात आल्याचे समजते. आगामी निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद ताब्यात घ्यायचीच असे नियोजन पक्षाच्या वरिष्ठांकडून केले जात आहे. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करायचा असेल फोडाफोडीच्या राजकारणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपने या अँगलनेही तयारी चालवल्याची माहिती आहे.

मध्यंतरी राज्याच्या राजकारणात ज्या घटना घडल्या त्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी भाजपने जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना विशेष जबाबदारी दिली आहे. त्यांनीही कामाला सुरुवात केली असून नाराजांची चाचपणी केली जात आहे.

काँग्रेसला पुण्यात खिंडार, माजी आमदार भाजपात

जिल्ह्यात काँग्रेसचे दोन जनाधार असलेले नेते होते. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे तर दुसरे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप. यातील थोपटे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. थोपटे कुटुंबाचे भोर मतदारसंघात चांगले वजन आहे. या मतदारसंघावर त्यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. यानंतर आता माजी आमदार संजय जगताप देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच या चर्चा सुरू होत्या. परंतु, त्यावेळी जगताप यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता मात्र जगताप भाजपात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय जगताप येत्या 16 जुलैला भाजपात प्रवेश करतील असेही सांगितले जात आहे. या घडामोडींवर संजय जगताप यांनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. महाविकास आघाडीतील नाराज मंडळींनाही पक्षात घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

मोठी बातमी : गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा होणार; आशिष शेलार यांची घोषणा

follow us