Download App

BJP : कामं करा, नाहीतर राजीनामा द्या; बावनकुळेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?

BJP : राज्यात निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेत्यांनी मतदारसंघांचे दौरे सुरू केले आहे. विरोधकांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या नेतेमंडळींचे सोशल इंजिनियरिंगही पाहण्यास मिळत आहे. गणेश मंडळांना भेटींच्या माध्यमातून मतदारसंघांचाही कानोसा घेतला जात आहे. त्यातच काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुण्यात होते. येथे त्यांनी गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच आढावा बैठकीतून नेते पदाधिकाऱ्यांना तंबीही दिली.

व्यवस्थित कामे करा अन्यथा राजीनामा घेऊ अशी तंबी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. भाजपची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत बावनकुळे अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसले. यावेळी त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जे पदाधिकारी व्यवस्थित काम करणार नाहीत त्यांचा राजीनामा घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, भाजपाच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदांवरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर बावनकुळेंनी या कार्यकारणीची बैठक घेतली.

Sujay Vikhe : ‘जिनको शक था हमारी काबिलियत पर’.. शेरोशायरीतून खा. विखेंचे विरोधकांना चिमटे

प्रदेश प्रवक्तेपदी संदीप खर्डेकर

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे शहरामध्ये नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandip kharadekar) यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्लॅन बी कशाला?

विरोधकांना काहीच सुचत नसल्याने हा प्लॅन बी नावाचा फुसका बॉम्ब सोडला आहे. भाजपकडे कोणताही प्लॅन बी नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही. महायुतीचं लक्ष्य लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं आहे. मोदींच्या कामांमुळे सगळे त्यांच्याकडे पाहूनच मतदान करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या समन्वयकपदाची जबाबदारी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकरांवर

Tags

follow us