Sujay Vikhe : ‘जिनको शक था हमारी काबिलियत पर’.. शेरोशायरीतून खा. विखेंचे विरोधकांना चिमटे

Sujay Vikhe : ‘जिनको शक था हमारी काबिलियत पर’.. शेरोशायरीतून खा. विखेंचे विरोधकांना चिमटे

Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ‘वाकिब कहा जमाना हमारी उडान से, वो और थे जो गए आसमान से, रखकर चांद पर कदम आज हमने इतिहास बना दिया, जिनको शक था हमारी काबिलियत पर, आज उन सबको गवाह बना दिया’, अशा शेरोशायरीतून त्यांनी चांद्रयान मोहिमेचे कौतुक केले.

Women Reservation Bill : मोठी बातमी! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

या मोहिमेत 100 महिला वैज्ञानिक होत्या या सर्व महिलांचे त्यांनी विशेष कौतुक करत नारिशक्तीचे प्रतिक म्हणून देखील चांद्रयान ३ मोहिमेकडे पाहिले जाईल असे त्यांनी सांगितले. सतराव्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवीन संसद भवनात चांद्रयान ३ मोहीम यशस्वीते बद्दल आयोजित विशेष चर्चेत सहभाग घेत खा. विखे यांनी आपल्या दहा मिनिटांच्या निवेदनात सर्वांना मंत्रमुग्ध केले.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की लहानपणी आम्ही नेहमी ऐकलेली कविता “चंदामामा दूर के पुए पकाए पुरके, आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली में” या कवितेचा दाखला देत ते म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून आतागायत तसेच आहे. स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरिबाला साधे पाणी पण दिले नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहचविले . चांद्रयान 2 अयशस्वी झाल्यावर इस्रोचे (ISRO) संचालक हे खूप नाराज झाले होते मात्र नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी त्यांना त्यावेळी नुसता धीर दिला नाही तर त्यांना पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान 3 मोहीम सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. या यशस्वी मोहीमबद्दल त्यांनी खास शेरोशायरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवशक्ती पॉइंटवर हालचालींना वेग; विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

“ये चांद तेरी जिद के आगे क्या मैं नतमस्तक हो जाऊंगा,
तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आजावूंगा।
तू दूर है भले ही मुझसे ,पर पास कभी तो आयूंगा।
है प्रेम अमर मेरा तुझसे,मैं उसको छोड़ना पावूंगा।
उस बार जिद चलेगी मेरी ,उसको याद दिलाऊंगा।
तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आवूंगा, मैं फिरसे वापस आऊँगा।

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube