‘मीडियाकडून प्रतिमा चुकीची करण्याचा प्रयत्न’; शरद मोहोळ हत्येनंतर राणेंची माध्यमांनी विनंती

Nitesh Rane On Sharad Mohol : मीडियाकडून शरद मोहोळ (Sharad Mohol) यांची चुकीची प्रतिमा करण्याचा प्रयत्न होत असून मीडियाने बदनामी थांबवावी, अशी विनंतीच भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांना केली आहे. दरम्यान, शुक्रवारी शरद मोहोळ याची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच घटनेतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातच […]

Nitesh Rane : पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर; राणेंच वादग्रस्त वक्तव्य

Nitesh Rane

Nitesh Rane On Sharad Mohol : मीडियाकडून शरद मोहोळ (Sharad Mohol) यांची चुकीची प्रतिमा करण्याचा प्रयत्न होत असून मीडियाने बदनामी थांबवावी, अशी विनंतीच भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माध्यमांना केली आहे. दरम्यान, शुक्रवारी शरद मोहोळ याची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच घटनेतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातच आज नितेश राणे यांनी शरद मोहोळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

KGF फेम यशचा वाढदिवस चाहत्यांना पडला महागात; सेलिब्रेशनच्या तयारीत तिघांचा मृत्यू

नितेश राणे म्हणाले, आजची ही भेट राजकीय नसून स्वाती मोहोळ हिंदु समाजाच्या आंदोलनासाठी सक्रिय असतात. जिथे जिथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्याना संकट आलं तिथे शरद मोहोळ उभं राहिले आहेत. त्यामुळे अशा संकट काळात मोहोळ कुटुंबियांसोबत आम्ही एक हिंदु म्हणून उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आज स्वाती मोहोळ यांना आम्ही आधार देण्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी काम पुढे ताकदीने नेण्यासाठीच विनंती केली असल्याचं नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क कसे मिळाले? महसूल विभागाने सांगितलं लॉजिक

तसेच आम्ही एक परिवार म्हणून मोहोळ कुटुंबियांसोब असून स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे या घटनेनंतर आता पोलिसांच्या तपासात जे काही पुढे येईल ते आपल्या समजणार आहे. मात्र, हिंदु समाजासाठी मोहोळ कुटुंबियांनी केलेलं निर्विवाद कामामुळेच आज आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं राणे म्हणाले आहेत.

मीडियातल्या लोकांनी चुकीची प्रतिमा समोर आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. यामुळे मोहोळ कुटुंबियाची प्रचंड नाराजी असून ते गुन्हेगारी क्षेत्रात कसे आले? का आले? याची माहिती नससतानाही माध्यमांकडून चुकीची माहिती प्रसारित करणं माध्यमांनी थांबवावं, माध्यमांनी याबाबत थोडा विचार करावा, अशी विनंतीच राणे यांनी यावेळी केली आहे.

स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेतली?
शरद मोहोळची दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिने पुण्यातच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या पतीचा हत्येबाबत त्यांनी फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली आहे. स्वाती मोहोळ यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या भाजपच्या पदाधिकारीही आहेत.

Exit mobile version