शरद मोहोळचा पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, काय मागणी केली ?

  • Written By: Published:
शरद मोहोळचा पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, काय मागणी केली ?

Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिने पुण्यातच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली आहे.


बच्चे मन के सच्चेच असतात, पण काही खोड्या काढणारे; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. शहरातील डीपी रोडवरील शहर भाजपच्या नव्या कार्यालयाच्या कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्यामुळे स्वाती मोहोळ यांनी कार्यालयाजवळच फडणवीस यांची भेट घेतली आहे. आपल्या पतीचा हत्येबाबत त्यांनी फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली आहे. स्वाती मोहोळ यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या भाजपच्या पदाधिकारीही आहेत.


आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

पकडण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २० वर्ष), नामदेव महीपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहु शेळके, विनायक संतोष गाव्हणकर, विठ्ठल किसन गांदले यांना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर अॅड. रविंद्र वसंतराव पवार व अॅड. संजय रामभाऊ उडान या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली.

पिस्तुल कुठून आणले ?

आरोपी मुन्ना संतोष पोळेकर याने मोहोळ याची हत्या करण्यासाठी तीन-चार महिन्यांपूर्वीच काही पिस्तुल मागविले होते. त्या पिस्तूलमधून मोहोळचा गेम वाजविण्यात आला आहे. त्यातील काही पिस्तुल पोलिसांनी जप्त केलेले आहेत. या आरोपीने हे पिस्तुल कोठून आणले आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube