Download App

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकातून अपहरण…

भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीयं.

Pune News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं पुण्यात भर चौकात अपहरण करण्यात आल्याची घटना घडलीयं. चार चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी अपहरण केलं असून याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाडक्या बहि‍णींचे 1500 रुपये बंद होणार? योजनेच्या लाभार्थ्यांचा रेकॉर्ड तपासला जाणार, त्रुटी आढळल्यास…

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे आज सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लू बेरी हॉटेल समोर थांबले असता अचानक एक चार चाकी समोर येऊन थांबली आणि त्यातील दोघा जणांनी त्यांना गाडीत बसवून त्यांचं अपहरण केल्याची माहिती मिळत आहे.

फडणवीसांसोबत व्यक्तिगत दुश्मनी नाही, तर केवळ तात्विक मतभेद; एकनाथ खडसेंचे संकेत?

याबाबत माहिती मिळताच सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाघ यांच अपहरण करून अपहरण करते सोलापूरच्या दिशेने गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर दावा, 103 जणांना पाठवली नोटीस

दरम्यान, गेल्या काही वर्षांची गुन्हेगारीची पुण्यातील आकडेवारी पाहता गुन्हेगारीचा चढता क्रम दिसत आहे. आता तर आमदाराच्याच मामाच अपहरण झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. याआधी पुण्यातील भर रस्त्यात कोयत्याने हल्ला तर गोळ्या झाडून हत्येच्या घटना घडल्या आहेत. आता आमदाराच्याच मामाचा अपहरण झाल्याने सामान्य माणसाच्या मनात सुरक्षा बाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

follow us