नड्डाचं जीव ओतून भाषण अन् विखे, दरेकरांच्या डुलक्या

BJP State Working Committee Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक पार पडली. मात्र या कार्यक्रमात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे भाषण सुरु होते. एकीकडं भाषण सुरु व दुसरीकडे मंचाच्या समोर बसलेल्या काही मंत्र्यांना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र झोप आवरेना असे […]

Untitled Design   2023 05 18T190507.769

Untitled Design 2023 05 18T190507.769

BJP State Working Committee Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक पार पडली. मात्र या कार्यक्रमात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे भाषण सुरु होते. एकीकडं भाषण सुरु व दुसरीकडे मंचाच्या समोर बसलेल्या काही मंत्र्यांना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मात्र झोप आवरेना असे दिसून येत होते. दरम्यान यापूर्वीही सभा सुरु असताना अनेक मंत्री डुलक्या घेत होते.

भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले होते. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जे. पी. नड्डा यांचे भाषण झाले. यावेळी स्टेजच्या समोर भाजपचे मंत्री तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी हे बसलेले होते.

देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंचा ‘शिल्लकसेना’ असा उल्लेख

एकीकडे मंचावरून नेत्यांचे भाषण सुरु असताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे डुलकी घेत असल्याचे दिसले. त्यांच्या बाजूलाच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर ही बसलेले होते. मात्र त्यांना देखील झोप आवरत नव्हती. दरेकर यांना देखील डुलकी लागली असल्याचे दिसत होते. दरम्यान पक्षाच्या बळकटीकरणासाठी व नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते व मंत्री मोठ्या जोशात भाषण करत होते. मात्र एकीकडे हे सगळे सुरु असताना दुसरीकडे मंत्री झोपा काढत असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल

आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे भाषण ऐकताना झोपत असल्याचे व्हिडीओ समोर आले असल्याने भाजपची मोठी नाचक्की होऊ लागली आहे. भाजपचे कॅबिनेट मंत्री तसेच आमदार यांच्यासमवेतच भाजपचेच काही कार्यकर्ते तसेच पदाधिकारी हे देखील कार्यक्रम प्रसंगी डुलकी घेत असल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version