काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल

काँग्रेसला देशाच्या विकासाचं काही घेणं देणं नाही…नड्डांचा हल्लाबोल

J P Nadda Speech on Congress : जगात मंदीचे सावट आहे. कोरोनामुळे परिस्थिती बिघडली होती मात्र या काळातही मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अर्थव्यवस्था संतुलित ठेवत जगाला एक वेगळा आदर्श दाखवून दिला. मात्र काँग्रेसला देशाच्या विकासाचा काही घेणं देणं नाही. ते केवळ चर्चा करतात. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कृतीतून देशाचा विकास घडवत असल्याचे जगाने पाहिले आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे.

भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले होते. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

अखेर तीन दिवसांनंतर शेवगावमधील बेमुदत बंद मागे

पुढे बोलताना नड्डा म्हणाले, विरोधकांना मोदींचा राग येत असतो. मात्र आज मोदींमुळे जगात भारताचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. मोदी वेगवेगळ्या देशांचे दौरे करत आहे. मात्र पूर्वीचे सरकार अनेक वर्षे कोणत्याही देशाचा दौरा करत नव्हते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान निर्माण करण्यामध्ये मोदींचे मोठे योगदान आहे, असे जे.पी.नड्डा म्हणाले आहे. आम्ही निवडणुकीच्या निकालाची कधी काळजी करत नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढतो आणि जिंकतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी आम्ही जिंकणार हे मी आज ठामपणे सांगतो. असे नड्डा म्हणाले.

फडणवीसांनी पुन्हा आळवला त्यागाचा सूर; भर कार्यकारिणीत इच्छुकांचे चेहरे पडले पांढरे

शेतकऱ्यांसाठी सरकार लाभदायी
आज शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत सरकारकडून दिले जात आहे. आज शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून देखील भरीव आर्थिक मदत केली जात आहे. मात्र हे सगळं पूर्वीच्या सरकारमध्ये होत नव्हतं, असे म्हणतच नड्डा यांनी विरोधकांवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube