Download App

PM मोदींना मारून टाकू तसेच….; पुण्यातील व्यक्तीला आलेल्या धमकीनं खळबळ

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यात एकीकडे दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर मोठी खळबळ उडालेली असतानाच, आता पुण्यातील एका व्यक्तीला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारून टाकू तसेच भारतात विविध ठिकाणी ब्लास्ट घडवून आणू, अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोशल माध्यमांवर विदेशातून मेसेज करत एका व्यक्तीनं ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असल्याचेही धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. या धमकीनंतर संबंधित व्यक्तीने या प्रकरणी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, अलंकार पोलीस अधिक तपास करत आहेत.

‘ते’ दहशतवादी ‘इसिस’ अन् ‘अल सुफा’शी संबंधित

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरुडमध्ये नाकाबंदीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून चौकशीदरम्यान एटीएसला धक्कादायक माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ संघटनेशी संबंधित असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता या गुन्ह्याची सुत्रे एटीएसकडून एनआयएकडे जाणार आहेत.

प्रा. हरी नरके यांचे निधन; ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत काळाच्या पडद्याआड

अटकेत असलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचं प्रकरण एनआयएकडे सोपवण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून उद्या 8 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढव्यात असताना या दहशतवाद्यांनी दुचाकीवर प्रवास करुन शहरातील संवेदनशील परिसरांची ड्रोनद्वारे पाहणी केली होती. जगात घडत असलेल्या दहशतवादी कारवायांचाही त्यांनी अभ्यास केल्याचं समोर आलं आहे.

शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ उधळून लावण्यासाठी मुंबई गॅसवर; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

ड्रोनच्या माध्यमातून पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट त्यांचा होता का? त्यांनी दुचाकी चोरीचा प्रयत्न का केला? अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात किंवा पुण्यात त्यांचा साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट होता का?, या बाबी तपासात पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आहेत.

Tags

follow us