प्रा. हरी नरके यांचे निधन; ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत काळाच्या पडद्याआड

प्रा. हरी नरके यांचे निधन; ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत काळाच्या पडद्याआड

पुणे : ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke) यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात आज (9 ऑगस्ट) सकाळी मुंबईकडे जात असताना गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा  झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Senior social writer and thinker Prof. Dr. Hari Narke has passed away)

प्रा. नरके यांचा महाराष्ट्रातील समाजिक चळवळींशी निकटचा संबंध होता. फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारसरणीतील अग्रक्रमाचे विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जात होते. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा गाढा अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेचे ते उपाध्यक्ष देखील होते. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं.

शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ उधळून लावण्यासाठी मुंबई गॅसवर; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

दरम्यान, छगन भुजबळ यांनी नरके यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत हा आपल्यासाठी मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली. नरके यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. मी विचार करू शकत नाही की ते आता आमच्यात नाहीत. महात्मा फुले यांच्याशी संबंधित अनेक जुनी पुस्तके शोधून काढून त्यांचे ऐतिहासिक लिखाण लोकांसमोर आणण्याचे काम नरके यांनी केली. फुले दाम्पत्याचं काम किती महत्त्वाचं होतं त्याची माहिती लोकांना पटवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या निधनाने समता परिषदेचं मोठं नुकसान झाल्याच्या भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, थोड्याच वेळात भुजबळ एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाणार आहेत.

‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल

हरी नरके यांचा शैक्षणिक क्षेत्राशी अत्यंत निकटचा संबंध राहिला. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सोबतच पुण्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं. संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच मराठी भाषाही एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून नरके यांनी योगदान दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube