‘मैं तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या पता, मेरी मंझिल है कहा’, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिमुकल्या अनाथ मुलींशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. गडकरींनी पुण्यातल्या ममता बाल सदन बालगृहातील चिमुकल्या मुलींशी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. विशेष म्हणजे या अनाथ आश्रमात येताच मुलींनी स्वागत केल्यानंतर गडकरी भारावून जात त्यांनी वाकून नमस्कार केला आहे.
Prajakta Mali: ‘जगाला हसवण्यासाठी आलेला तू देवदूत’; प्राजक्ताची समीर चौघुलेसाठी खास पोस्ट
मुलींशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी आपल्या जीवन प्रवास उलगडला आहे. तर अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्याही आठवणींनी त्यांनी उजाळा दिला देत संस्थेला 11 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलं. नितीन गडकरी यांना मिनल नामक मुलीने जीवनप्रवासावर प्रश्न विचारताच गडकरींनीही दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, मी खूप मोठा नाही पण जेव्हा मला युट्यूबकडून अडीच ते तीन लाख रुपये मिळाले तेव्हाच मला प्रचिती आली. मी कधीच वाचून बोलत नाही मनात येईल तेच बोलतो, नव्या तंत्राचा, नवं काही शिकण्याचा माझा सततचा ध्यास असतो, मैं तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या पता, मेरी मंझिल है कहा’ असं म्हणत त्यांनी उत्तर दिलं.
Ahmednagar Crime: नगर हादरलं! केडगावात अज्ञात व्यक्तीचा खून, रस्त्यावरच मृतदेह
सिंधुताईंच्या आठवणींनी उजाळा :
गडकरी म्हणाले, माईंचा आणि माझा जवळचा संबंध होता. त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आपला जीवन प्रवास केला. अनेक यातना सहन केल्या. त्यांचा अनेक प्रकारे उपहास झाला, अपमान झाला पण त्या डगमगल्या नाहीत. त्या सतत काम करीत राहिल्या. समाजातल्या ज्याला कोणीच नाही त्याला माईंनी आधार दिला. अशा मुला-मुलींचे पालकत्व स्वीकारले. मी अगदी जवळून त्यांचं कार्य बघितलं आहे. ममता बाल सदनला भेट दिल्यावर माईंच्या कार्याची अधिक जाणीव होते. त्यांचे कार्य ईश्वरीय कार्य होते ते थांबता कामा नये, असं गडकरींनी सांगितलं आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका
याप्रसंगी चिमुकल्या मुलींनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. दरम्यान, आकांक्षा हिने गडकरी यांचे उत्तम रेखाचित्र रेखाटले होते हे चित्र भेट देतात गडकरी यांनी आकांक्षाचे आभार मानले. यावेळी गडकरी मुलांमध्ये रमल्याचे दिसून आले. ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी माईंच्या सर्व संस्थाची माहिती दिली.
https://www.youtube.com/watch?v=4kHPPxLzHfE
दरम्यान, याप्रसंगी ममता सपकाळ, अधीक्षिका स्मिता पानसरे, विनय सपकाळ, तहसीलदार विक्रम राजपूत, सरपंच मंजुषा गायकवाड यांच्यासह ममता बाल सदनचे सर्व मुली कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.