कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवले…बारामतीत गुन्हा दाखल

Case Filed Against Kalicharan Maharaj in Baramati : आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कालिचरण महाराज यांच्या अडचणीत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य त्यांना भोवले आहे. कारण याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. […]

Untitled Design (71)

Untitled Design (71)

Case Filed Against Kalicharan Maharaj in Baramati : आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कालिचरण महाराज यांच्या अडचणीत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य त्यांना भोवले आहे. कारण याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वीही त्यांच्यावर अनेकदा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी अतुल जाधव यांनी २५ एप्रिल रोजी फिर्याद दिली. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, बारामतीत ९ फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा पार पडला. या मोर्चाचे व्हिडीओ पोलिसांनी पाहिले. व्हिडिओची तपासणी केली असता यामध्ये पोलिसांना आक्षेपार्ह वक्तव्य आढळली. जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले.

लोणीकडे निघालेलं लाल वादळ थांबलं; सरकारच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित

विशेष म्हणजे या मोर्चापूर्वी आयोजक विकास देवकाते यांना पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती. शहरातील तीन हत्ती चौकात मोर्चाचा समारोप झाला. तेथे कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. आयोजक देवकाते यांनी नोटीस स्वीकारल्यानंतर त्याचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version