पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप (BJP) नेते सुनील देवधर यांच्या तक्रारीनंतर 153 (अ), 500 व 505 या कलामांतर्गंत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय वागळे यांची आज (9 फेब्रुवारी) होणारी ‘निर्भय बनो’ या सभेलाही परवानगी देऊ नये अन्यथा सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे. (case has been registered against senior journalist Nikhil Wagle for making highly offensive and insulting remarks)
आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे भाषण होऊ देणार नाही. कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी पुणे भाजप चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचे भाषण उधळून लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
घाटे म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केले होते. केवळ प्रसिद्धी साठी वागळे हे सातत्याने अशी भाष्ये करून सवंग लोकप्रियता मिळवत असतात. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा वादग्रस्त माणसाचे भाषण पुण्यासारख्या शांतता प्रिय शहरात ठेऊन पुण्याची शांतता बिघडवत असेल तर ते भाजप कधीही सहन करणार नाही.
जर पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही वागळेंचे भाषण उधळून लावू असा इशारा घाटे यांनी दिला. याबाबत पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, यावर निखील वागळे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून ते सभा घेण्यावर ठाम आहेत. तसेच या सभेला पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले आङे.