पुणेः राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे ( Rupali Thombare) यांच्यामधील वाद आता विकोपाला गेलाय. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले होते. दोन दिवसांपूर्वी मारहाणीची तक्रार करणाऱ्या महिलेच्या फिर्यादीवरून रुपाली पाटील यांची बहिणी प्रिया सूर्यवंशी, चुलत बहिण आणि मावशीविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता मारहाणीचा दावा करणारी महिला माधवी खंडाळकर, तिचे पती व अन्य दोघे अशा चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एकमेंकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रुपाली चाकणकर यांच्या सांगणावरून महिलेने गुन्हा केल्याचा आरोपही रुपाली ठोंबरे यांनी केलाय. (case-registered-against-rupali-thombre-patils-sister-for-assaulting-a-woman-pune)
रुपाली ठोंबरेच्या बहिणीविरुद्ध गुन्हा
माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे यांची बहिण प्रिया सूर्यवंशी यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर खडक पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर दोन्ही बाजूने वाद मिटल्याचे सांगून तक्रार अर्ज मागे घेण्यात आले. परंतु शुक्रवारी माधवी खंडाळकर हिने खडक पोलिस स्टेशनला येऊन मारहाणीचा तक्रार नोंदविली. माधवी खंडाळकर हिच्या तक्रारीवरून रुपाली ठोंबरे यांची बहिण प्रिया ठोंबरे, एक चुलत बहिण, मावशी अशा तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर रुपाली ठोंबरे याही बहिणीसह पोलिस स्टेशनला आल्या. त्यानंतर प्रिया ठोंबरे-सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून माधवी खंडाळकर, तिचे पती मंदार खंडळकर, मयूर रणधीर, मनिष रणधीर यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदविला आहे.
रुपाली चाकणकरांच्या दबावामुळे गुन्हा; ठोंबरेंचा आरोप
माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. माझा कुटुंबाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे. रुपाली चाकणकरांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. सूत्र कुठून हल्ली आहेत हे मला माहित आहे. चाकणकर ही जळते आहे. तिला कामाने सिद्ध होता येत नाही. चाकणकर बाई, आता थेट गाठ माझ्याशी आहे. सुरुवात तू केली आहे. याचा शेवट रुपाली ठोंबरे करेल. रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. तिच्याविरुद्ध मी अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे.
