Case registered against son of former NCP city president Deepak Mankar in Fake Stamp Paper case : नुकतंच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना शंतनू कुकडेंवर झालेल्या बलात्कारांच्या आरोप प्रकरणामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता..2 त्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल झाला आहे .पाच कोटींच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरल्याच्या प्रकरणांमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महिलांवर बलात्कार करणारा आरोपी शंतनू कुकडे यांच्याकडून मानकर यांच्या मुलाने 50 लाख रुपये घेतल्याचा समोर आलं आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात शंतनू कुकडे, करण मानकर यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. करणे हे कर्ज शंतनू कुकडे यांच्याकडून घेतलेल्या पाच कोटी रुपयांच्या कर्जासाठीच हा स्टॅम्प व्यवहार करण्यात आला जो बनवत होता.
युपीएससीने परमिशन दिली अन् नावात बदल; पूजा खेडकर स्पष्टच म्हणाल्या
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं ज्यावेळी शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर आणखी एका सामूहिक बलात्कारात देखील त्याचा सहभाग होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे आणि रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा व्यवहार झाल्याचा समोर आलं. तरी चौकशी केली असता दीपक मानकर, करण मानकर आणि सुखे शहा यांच्या बँक खात्यावर हा लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता.
>अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांकडून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता करण मानकरने आपल्या जबाबात डोणजे या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू आपल्याला पाच कोटींचं कर्ज देणार होता. हे कर्ज पुढील 40 वर्षांसाठी देण्यात येणार होते त्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला होता मात्र पोलीस तपास दरम्यान हे दस्तावेज बनावट असल्याचं समोर आलं. त्यामुळे दीपक मानकर यांचा मुलगा म्हणजेच करण मानकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.