चंद्रकांत पाटलांवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण; रील स्टारसह दोघांविरोधात गुन्हा दाखल
objectionable video about Chandrakant Patil प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
objectionable video about Chandrakant Patil case registered against two individuals, including ‘Reel star’ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात सोशल मीडिया रील्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या संतोष पंडित याच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलीस कमिशनरच्या एका आदेशाने DJ चा आवाज कायमचा बंद होणार?
या संदर्भात भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ICU मध्ये; नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी काय दिली अबडेट?
माहितीनुसार, ‘राजकारण एक्सप्रेस’ नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये जनतेच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींवर टीका करण्यात आली होती. मात्र, टीकेदरम्यान आक्षेपार्ह शब्द आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Shevgaon Taluka : पावसाची पाठ! शेवगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट… बळीराजा हतबल
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित व्हिडिओ जाणीवपूर्वक मंत्र्यांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने तयार करून प्रसारित केल्याचा आरोप करत सुनील पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळात 4 मोठे निर्णय; पुणेकरांना दिलासा
तक्रारीनंतर डेक्कन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३५६, २९६ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, व्हिडिओ तयार करणे आणि प्रसारित करण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.