Export duty on onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याने आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते. मग दर पडल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही? केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% कर लावला आहे. यावरुन बच्चू आक्रमक झाले आहेत. ते पिंपरी चिंचवडमध्ये दिव्यांग विभाग आपल्यादारी या कार्यक्रमाला आले होते.
Devendra Fadanvis यांच्या जपान दौऱ्यातील काही क्षणचित्रे, पाहा…
बच्चू कडू पुढं बोलताना म्हणाले की कांदा परवडत नसेल तर खावू नये म्हणता माझ्याकडे लसूण आहे, मुळाही आहे, अशी टीका त्यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता केली. सरकार खाणाऱ्यांचा विचार करते. पण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करत नाही. ही नालायक प्रवृत्ती असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.
नाफेडची कांदा खरेदी निव्वळ दिशाभूल; पटोलेंनी सगळा इतिहासच सांगितला
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करुन ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे. पण त्यामुळे केंद्र सरकारने इतके घाबरण्याची काय गरज आहे? मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल ना, आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. एकही जागा न मागता एनडीएला ताकदीने पाठिंबा देऊ, सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे.