Devendra Fadanvis यांच्या जपान दौऱ्यातील काही क्षणचित्रे, पाहा…

1 / 8

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, सोमवारी पहिल्या दिवशी टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले.

2 / 8

त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

3 / 8

फडणवीसांच्या या दौऱ्यात भारत आणि जपान याच्यातील मैत्रीचा नवा अध्यय सुरू होणार असून, उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य आदी बाबींसाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

4 / 8

या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचाही आनंद लुटला.

5 / 8

फडणवीसांच्या जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते कोयासनला पोहचले वाकायामा प्रांताचे माननीय गव्हर्नर शुहेई किशिमोटो सान, आणि विद्यापीठाचे अध्यक्ष र्युशो सोएदा सान यांनी त्यांचं स्वागत केलं.

6 / 8

दरम्यान त्यानंतर फडणवीसांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानमधील कोयासान विद्यापीठाने केली आहे.

7 / 8

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांमधून जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी त्यांना ही पदवी मिळाली आहे.

8 / 8

विद्यापीठाचे अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. तर आगामी भारत भेटीमध्ये त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube