Download App

चंद्रकांतदादांना अमरावती भावलं; अजितदादांची स्टाईल करणार फॉलो

Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.तर चंद्रकांत पाटलांना अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत पाटील पुण्यात नियमित बैठका घेत नसतं. अशी त्यावरून अनेकदा चर्चा झाली होती. त्यानंतर आता दर आठवड्याला अमरावतीत यावं असा माझा संकल्प आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिल्याने अजितदादांना कॉपी करणार आणि त्यांना अमरावती आवडलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजितदादा स्टाईल घेणार बैठका…

आता दर आठवड्याला अमरावतीत यावं असा माझा संकल्प आहे. चंद्रकांत पाटलांनी दिल्याने अजितदादांना कॉपी करणार आणि त्यांना अमरावती आवडलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण गेल्या कित्येक वर्ष अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असताना दर आठवड्याला आढावा बैठक घेत होते. मात्र चंद्रकांत पाटील पुण्यात नियमित बैठका घेत नसतं. त्याबाबत राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी अनेकदा अजितदादांकडे तक्रार केली होती. तर आता मात्र चंद्रकांत पाटील हे म्हणाले आहेत की, आता दर आठवड्याला अमरावतीत यावं असा माझा संकल्प आहेत.

कंत्राटी भरती : उद्धव ठाकरेंच्या ‘पापा’त सहभागी होण्यास धनंजय मुंडे यांचा नकार

दरम्यान आज अरावतीमध्ये बैठक घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यामांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझा दौरा पूर्वनियोजित असल्याने मी पुण्यातील बैठकीला अनुपस्थित राहिलो. मात्र अजित पवारांनी तातडीची बैठक घेण्याचं कारण शेतकऱ्यांकडून पाण्याची डिमांड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेणं बरोबर आहे. मी बैठकीला ऑनलाइन लिंक करण्याचा प्रयत्न केला. पण ऑनलाईन लिंक होत नव्हतं. मात्र दुपारच्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित राहिलो. मात्र माझा दौरा पूर्वनियोजित होता, पण अजित पवारांनी जी बैठक बोलावली ती सुद्धा अर्जंट होती.

राहुल गांधींच्या ‘खासदारकीला’ सुप्रीम कोर्टाचे पुन्हा अभय; निर्णयाला आव्हान देणाऱ्याला मोठा दंड

तर बैठकीबद्दल सांगताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या कामात रेंगाळलेलापणा आम्हाला दिसला. आम्ही सक्त ताकीद दिली आहे. कृषी विभागात रिक्त असलेल्या जागांबदल जिल्हाधिकारी यांना सांगणार आहे. दर आठवड्याला अमरावतीला यावं असा माझा संकल्प आहे. मेळघाटात निधी जातो पण अंमलबजावणी होत नाही ते मी पाहायला जातो.

मला माहित नव्हतं मी लगेच जिल्हाधिकारी यांना दुकाने सुरू करण्यासाठी सांगितले. काही होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी काळजी घेतली. पण मी त्यांना म्हटलं काही होत नाही आणि व्हायच असेल तर चुकत नाही. मी कशासाठी ही तयार असतो. माझ्या बॅगमध्ये आठ शर्ट असतात. शाही फेकली की मी लगेच दुसरे शर्ट घालतो. आतापर्यंत दोनदा शाही फेकली पण मी तिसऱ्या मिनिटाला लगेच बाहेर पडतो. माझं पुणेचं नाही तर कोल्हापूरकडे पण लक्ष असतं.

Tags

follow us