Download App

Purandar Airport : तुम्हाला जमीन द्यायची नाही, पण सरकारला हवीये, हट्ट सोडा, 7 दिवसांत….; बावनकुळे काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawanukale : पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या (Purandar Airport भू संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध होतोय. शेतकऱ्यांनी ३ मे रोजी केलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं. त्यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनुकळेंनी (Chandrashekhar Bavanukale) आज माध्यमांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असं बावनकुळे म्हणाले.

डॉ. वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट, संशयित सून डॉ. शोनाली गायब, वडिलांसह परदेशात गेल्याच्या चर्चा 

बावनकुळेंनी आज माध्यमांशी चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी आज
भूसंपादनाला विरोध करणाऱ्या अनेक मान्यवरांशी केली. त्यांची मागणी आहे की, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवले गेलेले जे गुन्हे आहेत, ते कमी झाले पाहिजे. पण, काही अधिकाऱ्यांना स्थानिकांनी मारहाण झाली, त्याचे काही व्हिडिओ आहेत. या गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्षी सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागले. जे निरापराध आहेत, त्यांचे गुन्हे कमी करू, याबाबत मी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याशी चर्चा करेन.

VIDEO : प्रशासन झोपलंय का? अवैध वाळू तस्करांचा पाठलाग करत आमदार अमोल खताळ यांची धडक कारवाई 

पुढं ते म्हणाले, शेतकऱ्यांची पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही, अशी भूमिका आहे. मी त्यांना समजावलं. पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. शेतकऱ्यांचा माल आंतराष्ट्रीय स्तरावर निर्यात होऊ शकतो. विकासाच्या बाबतीत मुंबई आणि दिल्लीनंतर पुण्याचा नंबर लागलो. त्यासाठी हे विमानतळ करण्याचा मानस आहे. आणि ही भूमिका सरकार बदलणार नाही, सरकार विमानतळ करणारच आहे. तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी. त्यामुळं मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्ही सात दिवसांच्या आत सांगा. शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, असं सांगत पुरंदर विमानतळाच्या बाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं.

काहींनी चुकीच्य रेट डिक्लेअर केला. पण, तिढा सुटावा, यासाठी आम्ही शेतकऱ्यांशी पंधरा दिवसांनी दिवसांनी चर्चा करू. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू कायम राहावं, हीच आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असं बावनकुळे म्हणाले.

follow us