‘मतांची आकडेवारी बघा, म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल…’; २०१४ पासूनची आकडेवारी दाखवत बावनकुळेंचा पवारांवर हल्लाबोल
Chandrashekhar Bavanukale : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधक ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करत आहेत. काल शरद पवारांनीही (Sharad Pawar) मतांची संख्या सांगत आम्हाला मत जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी गावात पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने अशा प्रकारच्या मतदानाला बेकायदेशीर ठरवून विरोध केला. यानंतर शरद पवारांनी आज मारकडवाडीत जाऊन विरोधकांवर निशाणा साधला आणि त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला. त्यांच्या आरोपांना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळेंनी (Chandrashekhar Bavanukale) प्रत्युत्तर दिलं.
…खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार; राहुल नार्वेकरांनी सुनावलं!
मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब, मारकडवाडीत झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये, अशी टीका बावनकुळेंनी केली.
शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर… pic.twitter.com/Csy5uQVbI0
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 8, 2024
चंद्रशेखर बावनुकळेंनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.
राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होणार नाही; रामदास आठवलेंनी ठणकावून सांगितलं
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाल्याचं बावनकुळे म्हणाले.
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही, अशा शब्दात बावनकुळेंनी ठणकावलं.
यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल, अशा शब्दात पवारांवर निशाणा साधला.